देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास नेहमीच आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा प्रियांका एका सोशल मीडीया पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने काही दिवसांपूर्वी पती जोनास बरोबर काढलेला एक फोटो इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या पोस्टखाली तिने “मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे” असे लिहीत निकचे वय २७ वर्ष आहे, असे लिहले होते. या पोस्टवरुन नेटीझींसने प्रियांकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नेटीझंसने प्रियांकाच्या या इंन्स्टाग्राम पोस्टवर मिष्किल प्रतिक्रीया देत तिची अक्षरश: खिल्ली उडवली आहे. त्यांनी प्रियांकाला तिच्या नवऱ्याचे खरे वय विचारले आहे. इंटरनेटवरील माहितीनुसार निक जोनासचा जन्म १६ सप्टेंबर १९९२ साली झाला. या अनुशंगाने विचार करता त्याचे वय २६ वर्ष आहे. मात्र प्रियांकाने त्याला एक वर्ष मोठा दाखवण्याचा प्रयत्न केला असे म्हणत नेटीझंसने तिला चांगलेच ट्रोल केले आहे. तसेच नवऱ्याचे वय न विचारता तिने लग्न तरी कसे केले असा प्रश्न देखील तिला आता विचारला जात आहे.
सोशल मीडीयाचा वापर करण्यात निक जोनास देखील मागे नाही. नेटीझंसच्या हाती आपली बायको ट्रोल होत आहे, हे लक्षात येताच तो तिच्या मदतीला धावून आला. त्याने क्षणाचाही विलंब न करता ट्रोलर्सला प्रत्युत्तर करणारी पोस्ट अपलोड केली. या पोस्टमध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल बॅटमॅन इंटरनेटच्या थोबाडीत मारत असल्याचे कार्टून आहे. तसेच पुढच्या दोन आठवड्यात तो २७ वर्षांचा होणार आहे, त्यामुळे प्रियांकाने कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही असेही या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.