VIDEO : रिसेप्शन पार्टीत दीपिका-प्रियांकाचा ‘पिंगा’

या दोघींनीही ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येत पिंगा गाण्यावर ठेका धरला .

नुकतचं लग्न झालेली दीपिका रणवीरची जोडीही या रिसेप्शन पार्टीत आली होती.

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही या महिन्याच्या सुरूवातीला विवाहबंधनात अडकले. या दोघांनीही बॉलिवूडसाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.

नुकतचं लग्न झालेली दीपिका रणवीरची जोडीही या रिसेप्शन पार्टीत आली होती. रणवीर हा प्रियांकाचा जवळचा मित्र मानला जातो. प्रियांकानं आपल्या साखरपुड्याला ज्या खास व्यक्तींना आमंत्रण दिलं होतं त्यात रणवीरही होता, मात्र काही कारणामुळे त्याला साखरपुड्यासाठी उपस्थितीत लावता आली नाही. मात्र शुक्रवारी रात्री पार पडलेल्या पार्टीत तो दीपिकासोबत आला होता. विशेष म्हणजे या पार्टीत दीपिका प्रियांकानं पिंगा गाण्यावर ठेका धरला.

https://www.instagram.com/p/BroFY0Nhtiu/

प्रियांका, दीपिका आणि रणवीर या तिघांनीही २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव- मस्तानी’ चित्रपटात काम केलं होतं. त्यातलं दीपिका- प्रियांकाचं ‘पिंगा’ हे गाणं खूपच गाजलं होतं. या दोघींनीही ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येत पिंगा गाण्यावर ठेका धरला . १ आणि २ डिसेंबरला पारंपरिक ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीनं हे दोघंही विवाहबंधनात अडकले. जोधपुरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka chopra nick jonas reception party deepika dance on pinga

ताज्या बातम्या