‘या’ ट्रीकमुळे प्रियांका झाली नाही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार

प्रियांकाने गॅमी पुरस्कार सोहळ्यात परिधान केलेल्या गाऊनमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली

प्रियांका चोप्रा, निक जोनास

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा प्रवास बॉलिवूडपासून सुरु झाला आणि तो आता हॉलिवूड चित्रपटांपर्यंत येऊन थांबला आहे. बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच प्रियांका काही हॉलिवूडपट आणि सिरीजमध्ये झळकली आहे. त्यामुळे आता विदेशातही तिचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अमेरिकेत स्थायिक झालेली प्रियांका बऱ्याच वेळा तिच्या पार्टी, पुरस्कार सोहळ्यांमुळे चर्चेत येत असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून तिने गॅमी पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या गाऊनमुळे चर्चेत येत आहे. चर्चेत येत आहे म्हणण्यापेक्षा ती ट्रोल होत आहे.

अलिकडेच गॅमी पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकाने पती निक जोनासोबत हजेरी लावली होती. या सोहळ्यात प्रियांकाने डीपनेक असलेला गाऊन परिधान केला होता. तिचा हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या गाऊनचा पुढचा गळा डीपनेकचा असल्यामुळे तो सांभाळणं प्रियांकाला कसं काय जमतंय ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर आता प्रियांका स्पष्टीकरण दिलं असून या ड्रेसमध्ये ती कंफर्टेबलपणे कशी वावरत होती हे सांगितलं. प्रियांकाने राल्फ अॅण्ड रुसो यांचा ड्रेस परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

“ज्या कपड्यांमध्ये मला वावरणं सहज सोप्प होईल अशाच पद्धतीने माझे कपडे तयार करण्यात येतात. तसंच हा ड्रेस जसा दिसत होता. तसा अजिबात नव्हता. या ड्रेसमध्ये एक पारदर्शक जाळीसारखं कापड लावण्यात आलं होतं. त्यामुळे समोरुन दिसताना जरी तो डीपनेक वाटत असला तरी माझ्यासाठी कंफर्टेबल होता”, असं प्रियांकाने सांगितलं.

वाचा : Grammy Awards 2020 : ‘देसीगर्ल’चा तडका

पुढे ती म्हणते, “कोणत्याही पुरस्कार सोहळ्यामध्ये मी फॅशनमुळे अडचणीत येणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असते.तसंच जेव्हा मी एखाद्या ड्रेसमध्ये कंफर्टेबल असते तेव्हाच घरातून बाहेर पडते”. दरम्यान, नुकताच गॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी गॅमी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या सोहळ्यामध्ये संगीत क्षेत्राशी जोडलेल्या सर्व गायक, संगीतकारांनी हजेरी लावली होती. यात प्रियांकादेखील तिच्या कुटुंबासोबत या सोहळ्यात उपस्थित होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priyanka chopra on grammy 2020 dress this is how she avoided a wardrobe malfunction ssj

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या