बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज प्रियांकाचा वाढदिवस आहे. आज प्रियांका तिचा ३९वा वाढदिवस साजरा करते. प्रियांका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचं ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या बालपणापासून बॉलिवूड ते हॉलिवूड तिचा प्रवास कसा होता हे सांगितलं आहे. त्यातलाच एक किस्सा समोर आला आहे, एका कॉरिओग्राफरने शूटिंग दरम्यान प्रियांकावर माइक फेकून मारला होता.

‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “प्रियांका, अक्षय कुमार आणि लारा दत्ता हे त्यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. हे तिघेही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होते. एका डान्सच्या सिक्वेन्ससाठी प्रियांकाला सेटवर असलेल्या सगळ्यांसोबत डान्सस्टेप मॅच करायच्या होत्या, मात्र तिला ते जमत नव्हते. यामुळे डान्स कोरिओग्राफर राजू खान यांनी रागात त्यांच्या हातात असलेला माइक प्रियांकाच्या दिशेने फेकला आणि तिला ओरडले. ते म्हणाले, ‘तू मिस वर्ल्ड आहेस तर असं समजू नकोस की तू डान्स सुद्धा करू शकतेस. कोणतही काम करण्याआधी ते व्यवस्थित शिकून घेतलं पाहिजे.’ या शब्दात त्यांनी प्रियांकाला फटकारले असे प्रियांकाने सांगितले.”

Akash chopra False Statement goes viral on Rohit sharma Ex Cricketer slams with social media post
आकाश चोप्राच्या नावाने रोहित शर्माबद्दल पसरवली जात होती अफवा, माजी क्रिकेटर चांगलाच भडकला
Prajjwal Revanna
सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लवकरच..”
bse sensex falls 188 59 points to settle at 74482 78
निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी
israil
लेख: गाझा संहार : अमेरिका काय करणार?

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

पुढे ती म्हणाली, “यावरून मला, या क्षेत्रात आलीली एक नवीन व्यक्ती आणि प्रोफेशनल व्यक्तीत काय फरक असतो हे समजलं. एखादी गोष्ट करताना त्याची पूर्ण तयारी करणं किती महत्वाचं असतं हे मला तेव्हा समजलं. तेव्हा मी ठरवलं की, यापुढे सेटवर जाण्याआधी मी पूर्ण तयारी करूनच जाणार.”

आणखी वाचा : ‘…म्हणून मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायची गरज वाटत नाही’ : करीना कपूर

पुढे प्रियांका म्हणाली, “आपल्या आठवणी लिहिणे जितके सोपे वाटते तितके सोपे नसते. हे खूप कठीण आहे कारण यामुळे आपल्या जुन्या जखमा उघडल्या जातात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे, मी कोणतीही गोष्ट करताना अर्धवट करत नाही.”