आपल्यापैकी अनेकांचं लहानपणी डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, अभिनेता-अभिनेत्री असं काही व्हायचं स्वप्न असतं. पण मोलकरीण व्हायचं कोणाचं लहानपणीचं स्वप्न असू शकेल का? आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या ‘देसी गर्ल’ म्हणजेच प्रियांका चोप्राचं हे स्वप्न होतं. थक्क झालात ना तुम्ही? पण हे खरंय आणि स्वत: प्रियांकानेच तसं सांगितलंय.
एका व्हिडिओमध्ये प्रियांकाने लहानपणीच्या स्वप्नाबाबत सांगितलंय. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘लहानपणी मला घरकाम करणारी महिला व्हावंसं वाटायचं. कारण मला साफसफाई करणं आणि झा़डू मारणं खूप आवडतं. लहानपणी मी माझ्या घरातील फरशी नियमितपणे साफ करीत असे. यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही.’ प्रियांकाचे हे वक्तव्य अनेकांना आश्चर्यचकीत करणारे असले तरी, स्वच्छतेबद्दल तिच्यात असलेली जागरूकता नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. प्रियांकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
वाचा : …म्हणून अक्षय कुमार करतोय ‘जुगाड’
सध्या बॉलिवूडची ही ‘देसी गर्ल’ तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. ‘बेवॉच’नंतर तिच्याकडे बऱ्याच हॉलिवूडपटांचे ऑफर्स आले आहेत. याशिवाय बॉलिवूडमध्येही ती अनेक प्रोजेक्टवर काम करीत आहे. प्रियांकाने पुन्हा एकदा एखाद्या दमदार बॉलिवूड चित्रपटातून पुनरागमन करावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.