एका आघाडीच्या कलाकाराच्या वाट्याला इतक्या सहजासहजी यश येत नाही ही बाब कोणीही नाकारु शकत नाही. अभिनेत्री, अभिनेता किंवा मग इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यश संपादन करण्यासाठी ज्या पद्धतीने काम करत असतात ती पद्धत अनेकांनाच भारावून सोडते. ‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’ ही हिंदीतील म्हण तर अनेकांनाच ठाऊल असेल. पण, ध्येयवेड्या लोकांसाठी मात्र ‘कुछ पाने के लिये बहुत कुछ खोना पडता है..’ असाच या म्हणीचा अर्थ होतो. अभिनय क्षेत्रातही अनेक कलाकार त्यांच्या या कौशल्याला आणखीन उठावदार बनविण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात. त्याच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. खासगी जीवनातील काही गोष्टींचा, खाण्यापिण्याच्या पदार्थांचा त्याग करण्यापर्यंत ठीक असतं. पण, प्रियांकाने तर तिच्या तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत गेल्या काही काळापासून उत्तम आरोग्याचा त्याग केल्याचे एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने भारतात आलेल्या प्रियांकाने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती २०१७ या वर्षासाठीचा संकल्प म्हणून काय ठरवले आहे याचा खुलासा करत आहे. सर्वांप्रमाणेच आपणही नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प करतो असेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पण, हे संकल्प प्रियांकाकडूनही पूर्णत्वास जात नाहीत हेसुद्धा तितकेच खरे. पण, यावेळी मात्र ती कटाक्षाने या संकल्पाचे पालन करणार असल्याचेच दिसत आहे. नवीन वर्षातील संकल्पाविषयी सांगताना प्रियांका म्हणते की ‘माझ्या फिटनेसकडे पाहून आणि एकंदर देहबोलीकडे पाहून अनेकांनाच मी उत्तम असल्याचे, माझे आरोग्य उत्तम असल्याचे वाटते. पण, तसे नाहीये’.
प्रियांका तिच्या संल्पाविषयी बोलताना सांगूनही गेली की तिला दिवसातून जवळपास २५ कप कॉफी पिण्याची सवय आहे. त्यामुळे आता हे एक प्रकारचे व्यसनच म्हणावे लागेल. ‘गोल्स ऑफ २०१७’ अशा नावाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रियांका स्वत:विषयीही खूप काही बोलून गेली आहे. या व्हिडिओमधून तिने फक्त चार तास झोपण्याच्या सवयीपासून ते अगदी खाण्याच्या वाईट सवयींप्रमाणेही सांगितले आहे. प्रियांका खाण्याची खूप शौकिन आहे. खाण्यासोबतच तिला व्यायाम करयलाही आवडतो. त्यामुळे आता प्रियांका तिच्या या नव्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यास यशस्वी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, प्रियांका २६ मेला प्रदर्शित होणाऱ्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड पटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेवॉच’ हा चित्रपट, याच नावाने गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ मुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत आहे.