‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रा लवकरच ‘बेवॉच’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, या चित्रपटाच्या प्रसिद्धीआधी ती काही महत्त्वांच्या कामांमध्ये गुंतली आहे. ‘युनिसेफ’च्या ग्लोबल अॅम्बेसिडरपदी प्रियांकाची नियुक्ती झाली हे तर आपण जाणतोच. याच पदाचं भान राखत आणि आपली सामाजिक जबाबदारी समजत प्रियांकाने आफ्रिकेतील काही गावांना भेट देत तेथील चिमुरड्यांसोबत एकच कल्ला केला. यावेळी तिने लहान मुलींना टिकल्या लावून चक्क त्यांच्यासोबत ‘बिंदी बॉण्डिंग’ केले. आता तुम्ही म्हणाल हा काय नवीन प्रकार…? तर, ‘बिंदी बॉण्डिंग’ हा शब्द खुद्द प्रियांकानेच तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोसाठी वापरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘देसी गर्ल’ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. चित्रपटसृष्टी आणि इतरांमध्ये असणारा तिचा वावरही नेहमीच लक्षवेधी असतो. अशा या अभिनेत्रीने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंना अनेकांचीच दाद मिळत आहे. मुख्य म्हणजे आफ्रिकेतील बच्चेकंपनीसोबत प्रियांकाने पोल डान्सही केल्याचं पाहायला मिळतंय. हा पोल डान्स नेहमीपेक्षा वेगळा असला तरीही पोल डान्सविषयी प्रियांकाच्या मनात असलेली भीती काही कमी झाली नाहीये हेच व्हिडिओ पाहताना लक्षात येतंय. एका खांबावरुन सर्रकन खाली येणाऱ्या लहानमुलाच्या मागोमाग त्याच खांबावरुन खाली येण्यासाठी प्रियांका मोठ्या उत्साहात पुढे झालीये खरी, पण, तिच्या चेहऱ्यावरील भीती सर्वांच्याच लक्षात येत आहे. मुख्य म्हणजे तिने स्वत:च हा व्हिडिओ पोस्ट करत ‘मी खरंच खूप घाबरले होते…. पोल डान्स नको रे बाबा…’, असं कॅप्शन दिलं आहे.

अभिनेता ड्वेन जॉन्सनसोबत आगामी ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रियांका व्यग्र होणार असून, त्याआधीच तिने काही क्षण बच्चेकंपनीसोबत व्यतीत केले आहेत. यावेळी ‘देसी गर्ल’च्या येण्याने त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. प्रियांकाच्या हातावरील ‘डॅडीज लि`ल गर्ल’ या टॅट्टूपासून ते तिच्या ठुमक्यांपर्यंत सर्वच गोष्टींबद्दल त्या लहान मुलांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे इन्स्टाग्राम स्टोरीजमधून प्रियांकाने त्या त्या गावांतील युवा पिढी आणि लहान मुलांची परिस्थिती सर्वांसमोर उघड केली.

प्रियांका चोप्रा ज्या कार्यक्रमांना हजेरी लावते त्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने तिची वेशभूषाही पाहण्याजोगी असते. ‘मेट गाला २०१७’च्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी अनेकांना घायाळ केल्यानंतर प्रियांकाना आफ्रिका भेटीमध्ये डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केलेली सुरेख साडी नेसली होती. तिच्या या साडीवर असणाऱ्या कलाकुसरीवर बऱ्याचजणांचा नजरा खिळल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quantico girl priyanka chopra visits villages in africa as a unicef representative
First published on: 08-05-2017 at 11:54 IST