PHOTO : आर माधवनचा हॉट सेल्फी पाहिलात का?

माधवनचा हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

R Madhavan
अभिनेता आर. माधवन

‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटानंतर तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेता आर. माधवनची अजूनही क्रेझ पाहायला मिळते. माधवनच्या हॉट अंदाजावर आजही तरुणी घायाळ होतात. माधवनने नुकतंच इन्स्टाग्रामवर आपला एक सेल्फी शेअर केला. या सेल्फीसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘प्रवास आणि रात्रीच्या दीर्घ झोपेनंतर आता सकाळी ताजेतवाने वाटत आहे.’ अंघोळीनंतरचा माधवनचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मॅडीचा हा हॉट सेल्फी पाहिल्यानंतर ‘रहना है तेरे दिल में’मधील त्याची सहकलाकार अभिनेत्री दिया मिर्झाही कमेन्ट करण्यापासून स्वत:ला रोखू नाही शकली. या फोटोवर दिया मिर्झाने ‘ओफ्फो…’ अशी कमेंट देत मॅडीची प्रशंसा केली आहे.

आर. माधवनने बॉलिवूडच्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. लवकरच तो एका तमिळ चित्रपटातसुद्धा झळकणार आहे. तमिळ भाषेतील थरारपट ‘विक्रम वेदा’ या चित्रपटात माधवन एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना आधीच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

madhavan-2

वाचा : सलमानची सुपारी देणारा ‘तो’ पोलिसांच्या ताब्यात

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘साला खडूस’ या चित्रपटात माधवनने बॉक्सर प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. लवकरच तो बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत तो झळकणार आहे. संजय पूरन सिंग दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसुद्धा भूमिका साकारणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधवनने म्हटलं की, ‘चॉकलेट बॉयची भूमिका साकारायचं माझं आता वय नाही.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: R madhavan shared a selfie post shower