“राधा प्रेम रंगी रंगली” ही मालिका कलर्स मराठीवर सुरु आहे. मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, उत्तम कथानक, कलाकार तसेच आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. कमी कलावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेनं २०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी २०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला आणि आनंद साजरा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील, कविता लाड, गौतम जोगळेकर या सगळ्यांनाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतं आहे. सध्या मालिकेमध्ये आलेल्या रंजक वळणाने मालिकेबद्द्लची उत्सुकता अजुनची वाढली आहे. राधा ‘प्रेमा’ म्हणून आनंद नाडकर्णी यांच्या इस्पितळात काम करत आहे. तसेच राधा गरोदर असल्याचे सत्य फक्त माधव निंबाळकर यांना माहिती आहे. आता मालिकेमध्ये विश्वनाथ यांनी प्रेमला देवयानीच्या कारस्थानाबद्दल सांगितले आहे. देवयानीचे हे कारस्थान प्रेम मोडून काढेल का? राधा आणि प्रेमची भेट होईल का ? या सगळ्यांची उत्तर येणाऱ्या काळात प्रेक्षकांना मालिकेतून मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radha pream rangat rangali complete 200 episode
First published on: 03-07-2018 at 17:56 IST