‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेत राधाची नवी ओळख येणार का प्रेमसमोर?

मालिकेत येणार नवीन वळण

radha serial
'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेत राधाची नवी ओळख येणार का प्रेमसमोर?

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये सुरु असलेलं कथानक म्हणजेच राधा नक्की जिंवत आहे कि देवयानीने खरोखरच तिला मारून टाकले आहे, यावरून प्रेक्षकांना चांगलंच गुंतवून ठेवलं होतं. शेवटी सत्य प्रेक्षकांसमोर आलं, जेव्हा प्रेमा म्हणून मालिकेमध्ये आलेल्या मुलीने राधाच्या वडिलांना म्हणजेच माधव निंबाळकर यांना फोन केला. राधाने त्यावेळेस सगळे गैरसमज दूर केले तसंच प्रेम देशमुख बाबा होणार या गोड बातमीचा खुलासादेखील केला. राधाने माधव निंबाळकर यांना ती कधीच बंगळुरू इथल्या विपश्यना केंद्रात गेली नसल्याचं सांगितलं. तसंच ती कुठल्याही कश्यपलादेखील ओळखत नाही असं सांगितल्यावर माधव यांना खूप मोठा धक्का बसला.

आता मालिकेत राधा इंदौरमध्ये एका इस्पितळामध्ये काम करत असून तिचं नाव प्रेमा असं आहे. मालिकेमध्ये नाडकर्णी कुटुंबाची एन्ट्री झाली असून आनंद नाडकर्णी हे प्रेमा म्हणजेच राधा ज्या इस्पितळामध्ये परिचारिकेचे काम करते आहे त्याचे हे मालक आहेत आणि आता प्रेमा आनंद नाडकर्णी यांच्या वडिलांची देखरेख आणि सेवा करण्यासाठी त्यांच्या घरी राहत आहे. आनंद नाडकर्णी यांची भूमिका विक्रम गायकवाड, त्यांच्या बायकोची भूमिका प्राची पिसाट तर वडिलांची भूमिका ऋषिकेश देशपांडे साकारत आहेत. या रविवारी प्रसारित होणाऱ्या विशेष एपिसोडमध्ये प्रेम आणि आनंद यांची अपघाताने भेट होणार आहे.

वाचा : ‘वीरे दी वेडिंग’ नंतर सुमित व्यासची पुन्हा एकदा वेब सीरिजकडे वाटचाल

यासगळ्यामध्ये राधा आणि प्रेमची भेट होईल का ? प्रेमसमोर राधाची नवी ओळख येणार का ? प्रेमला कधी कळणार ? सत्य कळल्यावर काय होणार ? मालिकेत कुठलं नवं वळण येणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Radha prem rangi rangali new twist in the marathi serial watch special episode on sunday