करोना व्हायरसचा फटका जगभरातील अनेक देशांना बसला आहे. या व्हायरसमुळे हजारोंच्या संख्येने लोक दगावले आहेत. या व्हायरसचा प्रसार रोखता यावा यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. घरातच राहण्याशिवाय आता दुसरा काही पर्याय नाही. अशातच अभिनेत्री राधिका आपटेने तिचा रुग्णालयातला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मास्क लावलेला रुग्णालयातला फोटो पोस्ट करत राधिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘रुग्णालयाला भेट’. मात्र ही भेट करोना व्हायरसमुळे नसल्याचं तिने पुढे स्पष्ट केलं. ‘ऑल इज वेल’ म्हणत तिने प्रकृती ठिक असल्याची माहिती दिली. तरीसुद्धा रुग्णालयात का गेली, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे.

महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे.