सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘कबाली’ सिनेमात काम केल्यानंतर आता अभिनेत्री राधिका आपटे एकाचवेळी अनेक सिनेमांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. लवकरच तिचा आयुषमान खुरानासोबतचा ‘द पियानो प्लेअर’ हा सिनेमा येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली असून, राधिकाने चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअरही केला आहे. पुण्यात या सिनेमाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. पण सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्याआधी वेळात वेळ काढून तिने व्हेकेशनसाठी इटली गाठलं. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या राधिकाने तिचे व्हेकेशनचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधिकाला नेहमीच नवनवीन गोष्टी पडताळून पाहायला आवडतात म्हणूनच की काय पाण्यात उडी मारतानाही ती प्रयोग करताना दिसते. दुपारच्या जेवणात ती फक्त टॉमेटोच खाते. तिचा पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. या व्हिडिओसोबतच तिने व्हेकेशनचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. ज्यांना तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स दिले आहेत. राधिका आपला पती बेनेडिक्ट टेलरसोबत सध्या हे व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिने तिच्या अनेक फोटोमध्ये त्याला टॅगही केले आहे.

काही दिवसांपूर्वी तिने एका मासिकासाठी हॉट फोटो शूटही केले होते. या फोटोशूटमधील छायाचित्रांमध्ये राधिका खूपच सुंदर दिसते. विशेष म्हणजे राधिकाने हे फोटोशूट कोणत्याही स्टुडिओमध्ये न करता स्वत:च्या घरात केले होते. तिने ही सर्व छायाचित्रे इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. ‘द पिआनो प्लेअर’ या सिनेमानंतर ती ‘ओवर द मून’ या सिनेमातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika aptes beach vacation is made of sun sea and sand see her holiday photos
First published on: 21-06-2017 at 14:17 IST