हिंदी चित्रपटसृष्टीचा अस्सल ‘शोमन’ म्हणून कायम राज कपूरचे नाव घेतले जाते. पण मग शोमनशीपमधे राज कपूरचा वारस कोण हा प्रश्न देखिल स्वाभाविकपणे पडतो… ऐंशीच्या दशकापासून सुभाष घईचे शोमन म्हणून नाव घेतले जाऊ लागले. शोमन म्हणजे मसालेदार मनोरंजनाची हुकमी हमी. यांची प्रत्येक गोष्ट जणू बातमीत राहते. गीत-संगीत-नृत्य यांचे दिमाखात रुपेरी सादरीकरण आणि प्रसार माध्यमे व प्रेक्षकांकडून अनेकदा तरी कौतुकाचा वर्षाव! यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच मंतरलेले दिलखुलास वातावरण. ‘कर्मा’ (१९८६) च्या वेळेस तसेच होते. सुभाष घईचा हा चित्रपट मुहूर्तापासूनच चर्चेत होता. दिलीपकुमार, नूतन, नसीरुद्दीन शाह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी पूनम धिल्लॉन, अनुपम खेर… असा जबरदस्त कलाकार संच व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत. एकूणच भव्यता स्पष्ट करणारे असेच चित्रपटाचे आगमन. आणि अशाच वातावरणात राज कपूरच्या हस्ते ‘कर्मा’च्या गीत-संगीत ध्वनिफितीचे प्रकाशन… अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील या सोहळ्यात राज कपूर व सुभाष घई यापैकी जास्त प्रभावित कोणी ठरले याचे उत्तर अनेक दिवस सापडले नाही व नंतर ते उत्तर मिळवणेही मागे पडले. चित्रपटसृष्टीतील असे सोहळे आनंदाने अनुभवायचे असतात. कारण दोन पिढ्यांचे शोमन एकत्र येण्याचे असे चंदेरी योग तसे कमीच. पण जेव्हा येतात तेव्हा ते कायमच आठवणीत राहतात ते हे असे. दिलीप कुमारच्या चित्रपटाच्या गाण्याच्या ध्वनिफितीचे राज कपूरच्या हस्ते प्रकाशन आणि हे दोघेही एकाच सोहळ्यात हा योग देखिल विशेषच…
दिलीप ठाकूर

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर