पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही योजना राबवली. लोकसहभागातून ही चळवळ आता चांगलीच जोर धरू लागली आहे. या योजनेसाठी अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत या चळवळीला हातभार लावला आहे. आपल्या अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राजश्री लांडगे ह्यांनी ही सामाजिक भान जपत ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेत अभिनेत्री राजश्री लांडगे यांनी ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. आज पाण्याची भीषण परिस्थिती आपण सारेच अनुभवत आहोत. ही योजना उपयुक्त असून समाजाप्रती असलेली बांधिलकी आपण प्रत्येकानेच जपायला हवी व शक्य तेवढे प्रयत्न पाणी वाचवण्यासाठी करणे गरजेचं असल्याचं अभिनेत्री राजश्री लांडगे यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राजश्री लांडगे यांच्या आगामी ‘ती फुलराणी’ या चित्रपटाला ही शुभेच्छा दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2016 रोजी प्रकाशित
‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी अभिनेत्री राजश्री लांडगेचा पुढाकार
मुख्यमंत्र्यांनी राजश्री लांडगे यांच्या आगामी ‘ती फुलराणी’ या चित्रपटाला ही शुभेच्छा दिल्या.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 17-05-2016 at 10:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajashree landges help for jalyukta shivar