प्रदर्शनापूर्वी २.0 नं कमावले ३७० कोटी !

५०० कोटी एवढं अफाट बजेट असलेला हा चित्रपट या महिन्याअखेरीस प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट २९ नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.

सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन यांची प्रमुख भूमिका असलेल्या २.0 नं प्रदर्शनापूर्वी तब्बल ३७० कोटींची कमाई केली आहे. ५०० कोटी एवढं अफाट बजेट असलेला हा चित्रपट या महिन्याअखेरीस प्रदर्शित होत आहे. तो पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत.

या चित्रपटाच्या डिजिटल आणि सॅटेलाइट हक्कांची याआधीच निर्मात्यांकडून विक्री करण्यात आली. यातून जवळपास १८० कोटी रुपये मिळाल्याचं समजत आहेत. आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि दक्षिणेकडील इतर भागात या चित्रपटाच्या वितरणाचे हक्कही विकण्यात आले आहेत. यातून १९० कोटी चित्रपटानं कमावले आहेत. डिजिटल, सॅटेलाइट आणि वितरणाच्या हक्कातून एकूण ३७० कोटींची कमाई केली या चित्रपटानं केली असल्याचं ‘बॉलिवूड हंगामा’नं म्हटलं आहे. जगभरातील १० हजार स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रॉबोट या गाजलेल्या चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे. जवळपास १ हजारांहून अधिक विएफएक्स आर्टिस्टनं या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे. आतापर्यंताचा हा भारतातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच अक्षय दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहेत. गेल्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र तांत्रिक अडचणींमुळे वारंवार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे गेली. आता हा चित्रपट २९ नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. शंकर दिग्दर्शित २.0 हा बाहुबलीचा विक्रम मोडणार का हे पाहण्यासारखं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajinkanth akshay kumar 20 earns rs 370 crores even before release

ताज्या बातम्या