scorecardresearch

Premium

असं मिळेल करोनावर नियंत्रण; राखी सावंतने सांगितला उपाय!

“कृपा करून मास्क वापरा”

rakhi-sawant

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी रावंत कायम चर्चेत असते. बिग बॉसचा शो असो किंवा मीडियाशी केलेली बातचीत राखी सावंत प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करत असते. नुकतच राखीला जिममधून निघताना पैपराजीने स्पॉट केलं. यावेळी राखीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. बिग बॉसच्या घरात राखीचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळत असला तरी मीडियाशी बोलताना राखी कायमच नम्र वागते. यावेळी फोटोग्राफर्सनी राखीला बॉलिवूडमधील वाढत्या करोनाच्या संसर्गावर प्रश्न विचारला. करोनावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो याचं राखने दिलेलं उत्तर अर्थातच हटके आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओत राखीने करोनाच्या संसर्गावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. यात राखी म्हणाली आहे, “कि अनेक जण कोव्हीडचे बनावट सर्टिफिकेट काढत आहेत. जर लोकांनी असं करणं बंद केलं तर करोनाचं प्रमाण कमी होईल. लोक विमानाने प्रवास करतात .800-1200 रुपये वाचवण्यासाठी ते कोव्हिडचं खोटं सर्टिफिकेट दाखवतात आणि म्हणतात त्यांची करोना चाचणी झाली आहे. आजुबाजुला जे कोणी असे खोटे लोकं आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करते की बनावट सर्टिफिकेट दाखवणं बंद करा आणि 24 तास मास्कचा वापर करा. ” असं राखी म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जेव्हा एका पैपराजीने राखीला बॉलिवूडमध्ये अनेकांना कोरानाची लागण झाली असून विकी कौशलला देखील करोनाची लागण झाल्याचं सांगितलं तेव्हा राखीला धक्काच बसला. कारण राखी आणि विकी एकाच जिममध्ये जातात. त्यानंतर राखीने विक्कीबद्दल चिंता व्यक्त केली तसचं. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनादेखील केली.

तर यावेळी राखी यावेळी काही जणाना मास्क घालण्यासाठी दमदाटी करताना या व्हिडीओत पाहायला मिळतंय. “मास्क लाव नाहीतर फोटो काढून देणार नाही.” असं राखीने एका फोटोग्राफरला बजावलं. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant said how corona will control funny video goes viral kpw

First published on: 06-04-2021 at 09:01 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×