बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क मासे आणि चिकनमुळे चर्चेत आहे. होय, राखने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील तिचा अवतार पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही.
असं काय आहे या व्हिडीओमध्ये?
राखीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये मासे आणि चिकनपासून तयार केलेले विविध पदार्थ दिसत आहेत. मात्र या स्वादिष्ट पदार्थांच्या आस्वादापासून राखी वंचित आहे. हे पदार्थ पाहून तिच्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटले आहे. या क्षणी राखीच्या तोंडावरचे हावभाव पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही. राखीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी राखीने करोना व्हायरसबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. “करोना व्हायरस जगभरात पसरला आहे. सगळेजण तुम्हाला सांगतायत हात धुवा, पाय धुवा.. डोक धुवा.., तोंड धुवा.. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार? आपण खूप पापं केली आहेत. जगात सगळ्यांनी पापं केली आहेत. तु्म्हाला काय वाटतं हा करोना व्हायरस कुठून आला आहे? करोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. मी सांगते तुम्ही अजूनही देवाच्या चरणी या. आपल्या पापांची माफी मागा. माझी खात्री आहे तुम्हाला करोना व्हायरस कधीही होणार नाही.” अशा आशयाची वक्तव्य राखीने या व्हिडीओमध्ये केली होती.