करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे घरात बसलेले कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना किंवा सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेता राम चरणचा देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चित्रपट निर्माते राजामौली यांनी नुकताचा राम चरणला एक चॅलेंज दिले होते. या चॅलेंजमध्ये त्यांनी राम चरणला घरातील कामे करतानाचा व्हिडीओ शेअर करायला सांगितला होता. आता राम चरणने ते स्वीकारत ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राम चरण घरातील लादी पूसताना, झाडांना पाणी घालताना, स्वयंपाक घरात कॉफी बनवताना दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गुरु राजामौली, तुम्ही दिलेले चॅलेंज मी पूर्ण केले आहे. घरातील कामे करण्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. तसेच आपल्या घरातील महिलांना आपण कामात मदत करायला हवी. मी हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आवाहन अभिनेता रणवीर सिंग, राणा डग्गुबती यांना करतो’ असे त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.