टेलिव्हिजन दुनियेतील सर्वात महागडा अभिनेता अशी ओळख असलेल्या राम कपूरची लोकप्रियता पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. एखाद्या हिरोसारखी त्याची उंची नाही की देहयष्ठीही नाही पण तरीही अनेकजण त्याचे चाहते आहे. नुकतेच राम कपूरने त्याचे वर्कआऊट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्याचे हे फोटो पाहून अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरूवात केली.
राम सोशल मीडियावर फार सक्रीय नाही. पण तरीही तो आपले वर्कआऊटचे काही फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर टाकण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सध्या राम जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. आता राम एवढी मेहनत शरीर सुदृढ ठेवण्यासाठी करतोय की त्याच्या आगामी सिनेमासाठी हे मात्र अजून कळू शकले नाही.
वर्कआऊट करतानाचे त्याचे फोटो पाहून तो फार आनंदी असल्याचे दिसून येत नाही. या फोटोंना कॅप्शन देताना रामने लिहिले की, ‘वर्क इन प्रोग्रेस.’
त्याच्या या फोटोंना एका युझरने ‘राम राम राम राम’ असे लिहिले. तर दुसऱ्या एका युझरने ‘लगे रहो रामजी लगे रहो’ अशी कमेंट केली. काही नेटकरांनी तर त्याहून पुढे जात लिहिले की, एक ब्रेड आता लोफ टोस्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. तर एकाने म्हातारपणी का एवढी मेहनत घेतोयस? १० पॅक्स करणार का? अशी कमेंट केली.
आता नेटिझन्सने केलेल्या या टिकेवर राम कशापद्धतीने उत्तर देतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रामच्या पत्नीने अनेक मुलाखतीत म्हटले होते की जर रामने वजन कमी केले तर तो अजून सुंदर दिसेल.
राम कपूरने छोट्या पडद्यावर एकता कपूरच्या मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत तो गौतमीला भेटला आणि त्या मालिकेच्या सेटवरच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. यानंतर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत तो साक्षी तन्वरसोबत दिसला आहे. मालिकांशिवाय त्याने ‘स्टुडंट ऑफ दी इयर’, ‘कुछ कुछ लोचा है’ या सिनेमांमध्येही अभिनय केला आहे.