लॉकडाउनच्या काळाता ८० ते ९०च्या दशकातील सर्व मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा दाखवण्यात आल्या. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने तर प्रेक्षकांच्या मानावर जादूच केली. आज रामायण मालिकेतील रावण हे पात्र साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचा ८२वा वाढदिवस आहे. अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामायण मालिकेतील सीता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी अरविंद यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे.

‘आतापर्यंत रावणाची सर्वात चांगली भूमिका साकारणारे अरविंद यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’ असे दीपिका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

रामायण मालिकेत लक्ष्मण ही भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी देखील अरविंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अरविंद त्रिवदेजी (रावण) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayan ravana turns 82 deepika chikhalia and sunil lahri wishing happy birthday avb
First published on: 08-11-2020 at 17:15 IST