रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अभिनेते अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली. पडद्यावर शांत दिसणारे अरुण गोविल हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही शांत स्वभावाचे आहेत. त्यांची पत्नी अभिनेत्री श्रीलेखा गोविल यांनी एका मुलाखतीमध्ये हा उल्लेख केला होता. पण याच शांत स्वभावामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना एकदा माझ्याशी जबरदस्ती लग्न केले आहे का? असा प्रश्न विचारला होता.
काही दिवसांपूर्वी अरुण यांच्या पत्नी श्रीलेखा यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी ‘अरुण काही बोलायचे नाही. म मी एक दिवस त्यांना माझ्याशी जबरदस्ती लग्न केले आहे का? कारण तुम्ही माझ्याशी काही बोलतच नाही असे विचारले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एक कार्ड दिले. त्यावर एका धबधब्याचे चित्र काढले होते आणि जर तु माझा शांत स्वभाव ओळखू शकली नाही तर मला कसे ओळखणार असे लिहिले होते. त्या दिवसापासून मी त्यांच्या भावना समजू लागले’ असे म्हटले. त्या दिवसापासून श्रीलेखा यांनी कधीही अरुण यांच्या स्वभावार प्रश्न विचारला नाही.
अरुण गोविल यांनी अभिनेत्री श्रीलेखा यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचे नाव अमल आहे आणि मुलीचे नाव सोनिया गोविल आहे. मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या मुलाविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी, ‘माझा मुलगा कॉर्पोरेट बँकर आहे. तो मुंबईमध्ये असतो. आम्ही एकत्रच राहतो. त्याला दोन मुले आहेत. तसेच माझ्या मुलीने लंडनमधून मास्टर्स केले आहे. आता ती बोस्टनमध्ये शिक्षणासाठी गेली आहे’ असे म्हटले.