अभिनेता रणबीर कपूरने मुंबईतील पाली हिल परिसरात ‘वास्तू’ अपार्टमेंट्समध्ये नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल ३५ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. ही इमारत १२ मजली असून, ती कपूर कुटुंबीयाच्या बंगल्याजवळ आहे.
वास्तू पाली हिल या नव्याने बांधलेल्या टॉवरमध्ये सातव्या मजल्यावर रणबीरचा फ्लॅट आहे. २४६० स्कवेअर फूटच्या या फ्लॅटसाठी रणबीरने प्रति चौरस फुट १.४२ लाख रुपये याप्रमाणे ३५ कोटी रुपये मोजले आहेत.
गेल्या वर्षी अभिनेता अक्षय कुमार आणि आमिर खानने वरळी आणि पाली हिलमध्ये मालमत्ता विकत घेतल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2016 रोजी प्रकाशित
Ranbir Kapoor: रणबीर कपूरने मुंबईत घेतला ३५ कोटींचा फ्लॅट
२४६० स्कवेअर फूटच्या फ्लॅटसाठी रणबीरने प्रति चौरस फुट १.४२ लाख रुपये मोजले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 16-05-2016 at 12:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor buys mumbai flat for rs 35 crore