अभिनेता म्हणून रणबीर कपूर पडद्यावर जरी कमाल करताना दिसत असला तरी शालेय शिक्षणात त्याची कामगिरी कशी होती हे कोणालाच माहित नाही. आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाचे प्रमोशन करताना रणबीर मुलाखतींमध्ये स्वत:बद्दलच्या अनेक लहानमोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतोय. ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करताना एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रणबीरने शालेय शिक्षणात आपण कसे होतो, तो अभ्यास कसा करायचा हे सर्व किस्से सांगितले.

लहान असताना अभ्यासात आपण इतके वाईट होतो की आई नीतू कपूर वडिलांकडे तक्रार करण्याची भीती दाखवायची असे रणबीर यावेळी म्हणाला. त्याचप्रमाणे तो लहान असताना ट्विटर नसल्याने खूप आभारी असल्याचेही म्हणाला. नाहीतर बाबा ऋषी कपूर यांनी शाळेतील कमी टक्केवारी ट्विटरवर सर्वांनाच सांगितली असती, असे मिश्किल उत्तर त्याने विद्यार्थ्यांना दिले.

‘प्रगती पुस्तक घेण्यासाठी आई माझ्या शाळेत यायची आणि मी नेहमी तिची माफी मागायचो. भविष्यात आणखी चांगला अभ्यास करेन आणि चांगले गुण मिळवेन असे तिला सांगण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या गुणपत्रिकेवर जर लाल पट्टी दिसली तर वडिलांकडे तक्रार करेन अशी भीती आई मला दाखवायची,’ असे रणबीरने सांगितले.

वाचा : हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीसोबत कतरिना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरात सर्वांत जास्त शिक्षित असल्याचे सांगत रणबीर पुढे म्हणाला की, ‘शिक्षणाच्या बाबतीत माझ्या घरच्यांचा इतिहास फार काही चांगला नाही. माझे बाबा आठवीत नापास झाले, माझे काका नववीत आणि आजोबा सहावीत नापास झाले. त्यामुळे कुटुंबात मीच सर्वांत जास्त शिक्षित आहे. दहावीत मला ५६ टक्के गुण मिळाले.’ अभ्यासात हुशात नसल्याने फुटबॉलकडे जास्त लक्ष देत असल्याचेही रणबीरने सांगितले.