ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या निर्मितीत साकारलेल्या ‘रांची डायरीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच रांचीला पोहोचले होते. या दौऱ्यात त्यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या घरीही भेट दिली. त्यानंतर धोनीच्या कुटुंबियांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल त्यांचे सोशल मीडियावरून आभार मानले. खेर यांनी धोनीच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली त्यावेळी त्यांना सर्वात जास्त भावली ती म्हणजे माहीची लाडकी लेक झिवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून झिवाच्या चातुर्याचं कौतुकही केलं. ‘झिवा खरंच खूप हुशार मुलगी आहे. त्यासोबतच ती खूप चांगल्या पद्धतीने समोरच्यांचं मनोरंजनही करते. ती खूप मोठ्या आवाजात गाते. अगदी आपलं राष्ट्रगीतही गाते… देवाचा तिच्यावर सदैव वरदहस्त राहो’, असं ट्विट त्यांनी केलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये खेर यांनी धोनी आणि त्याच्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला. या ट्विटमध्ये आपल्याला धोनीचं नवं घर आवडल्याचंही न विसरता नमूद केलं आहे.

रांची दौऱ्यामध्ये धोनीच्या घरी जाण्याचं कारण म्हणजे ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये खेर यांनी धोनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यामुळे धोनीच्या आयुष्याला त्यांनी बरंच जवळून पाहिलं आहे. तेव्हा रांचीमध्ये आल्यावर धोनीच्या घरी भेट न देणं, हे चुकीचं ठरेल. याच भावनेने ते ‘कॅप्टन कूल’च्या घरी गेले. धोनीने केलेल्या पाहुणचाराने ते फार प्रभावित झाले.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण..

‘रांची डायरीज’च्या प्रमोशनसाठी फक्त अनुपम खेरच नव्हे तर, चित्रपटातील मुख्य कलाकार हिमांश कोहली, सौंदर्या शर्मा, लेखक-दिग्दर्शक सात्विक मोहंतीसुद्धा रांचीला पोहोचले आहेत. या दौऱ्यात चित्रपटाच्या टीमने झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranchi diaries bollywood actor anupam kher says mahendra singh dhonis daughter ziva is genius and entertainer
First published on: 04-10-2017 at 12:11 IST