श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित ‘शिमगा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता भूषण प्रधान आणि राजेश शृंगारपुरे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर या चित्रपटातील दुसरं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘रंग तुझा गंध तुझा’ असे बोल असणारं हे दुसरं गाणं असून या गाण्यामध्ये भूषण प्रधान आणि मानसी पंड्या ही जोडी झळकली आहे. त्यासोबतच राजेश शृंगारपुरे आणि सुकन्या सुर्वेदेखील या गाण्यात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या गाण्यातील प्रेमाचा सुंदर, तरल अनुभव प्रत्यक्ष अनुभवल्याचा भास होत आहे.

या गाण्यात ढोल ताशांचा वापर केल्यामुळे मराठमोळ्या थाटातील हे गाणे सर्वांनाच ठेका धरायला लावणारे आहे. गाण्यात सुरुवातीलाच मानसी ढोल वाजवताना दिसत आहे. मूळची गुजराती असणाऱ्या मानसीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या गाण्याचे चित्रीकरण कोकणात झाले असून कोकणातील महत्वपूर्ण अशा ‘शिमगा’ या सणावर आधारित हा चित्रपट आहे. पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सायली पंकज आणि सौरभ साळुंके यांचा आवाज लाभला आहे. तर वलय यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी केले आहे. तसेच प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील निलेश कृष्णा यांनी सांभाळली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang tujha gandh tujha second song shimga
First published on: 27-02-2019 at 15:20 IST