जवळपास तीन वर्षांनंतर अभिनेत्री राणी मुखर्जी ‘हिचकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर नुकताच तिने एक फोटोशूट केला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीचं हे फोटोशूट होतं. यामधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या फोटोमधील राणीचा लूक थक्क करणारा आहे.

फोटोग्राफर अविनाश गोवारिकरने राणीचं हे फोटोशूट केलं आहे. मुलगी आदिराच्या जन्मानंतर राणीचं वजन वाढलं होतं. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने बरंच वजन कमी केलं आहे. तिचा हा नवीन लूक अनेकांनाच आकर्षित करतोय. अविनाशने ट्विटर अकाऊंटवर तिचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘माझी आवडती अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत ‘हिचकी’चं पब्लिसिटी शूट. राणीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही.’

वाचा : ‘या’ अभिनेत्रीमुळे त्रस्त आहे अक्षय कुमार 

२०१४ मध्ये दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या ‘मर्दानी’ चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. ‘हिचकी’नंतर ती लवकरच संजय दत्तच्या ‘मलंग’ चित्रपटातही भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.