करण कपाडिया हा अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा चुलत भाऊ आणि रणवीर सिंगचा जवळचा मित्र आहे. २०१५ मध्ये करण कपाडिया दिग्दर्शक नित्या मेहरासोबत विवाहबद्ध झाला. या लग्नसमारंभाला रणवीर आपली कथित प्रेयसी दीपिकासोबत उपस्थित होता. त्यावेळीसुद्धा दोघांच्या एकत्र उपस्थितीमुळे त्यांच्या नातेसंबंधाबद्दल बी-टाऊनमध्ये खूप चर्चा झाली होती. त्या लग्नामधील दोघांचे एकत्र फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांना पाहायला मिळाले नव्हते. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसमारंभातील दोघांचे नाचतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. दोघांचा वरातीतील अफलातून डान्ससुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
I love this Deepika and this Ranveer
https://www.instagram.com/p/BVuvln-hp_7/
https://www.instagram.com/p/BVuvLPIBjMO/
https://www.instagram.com/p/BVua1BJhC8U/
वाचा : राजामौलींच्या ‘त्या’ वक्तव्याने मी दुखावलेय- श्रीदेवी
या फोटो आणि व्हिडिओमध्ये रणवीरचा ‘बाजीराव’ लूक स्पष्ट दिसून येतोय. त्यावेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’चे चित्रीकरण सुरू होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये आता प्रेमसंबंध राहिले नसल्याचे म्हटले जात होते. बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटी जोड्यांप्रमाणेच या जोडीतही दुरावा आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. लवकरच हे दोघही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर याचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे.