लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटातील रणवीरचा नवीन लूक प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा लूक पाहून तो रणवीर आहे की कपिल देव आहेत हे ओळखणं कठीण झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीरने ट्विटवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो कपिल देव यांच्या सारखा नटराज शॉट खेळताना दिसत आहे. त्याचा हा लूक आणि नटराज शॉट खेळण्याची पद्धत पाहून तो हुबेहूब कपिल देव यांच्याप्रमाणे भासत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कपिल देव असल्याचाच भास होत असल्याचं दिसून येतं. हा फोटो शेअर करत नटराज शॉट. #RanveerAsKapil’ असं कॅप्शन रणवीरने या फोटोला दिलं आहे.

 वाचा : कंगना आणि वडिलांच्या नात्याविषयी सूरज पांचोलीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

दरम्यान, रणवीरचा हा फोटो पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच अभिनेता मयांग चॅग, अर्शद वारसी आणि कुणाल कोहली यांनीही रणवीरच्या या पोस्टवर कमेंट करत लूक आवडल्याचं सांगितलं आहे. ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh nails kapil dev natraj pose in new pic 83 movie ssj
First published on: 11-11-2019 at 14:33 IST