मुंबईतील चारकोप पोलिसांनी भोजपूरी अभिनेता मनोज पांडेला अटक केली आहे. त्याच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने १५ सप्टेंबरला मनोजविरोधात भारतीय दंडाधिकारानुसार ३९५/१७, ३७६, ३१७, ४०६, ५०६(२) तक्रार दाखल केली.
२०१५ मध्ये मनोजने जबरदस्ती पीडितेला गर्भपात करण्यास सांगितले होते. २०१२ पासून मनोज आणि ती लिव्ह इन रिलेशमध्ये राहत आहेत. दोघांची ओळख सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. याआधीही मनोजवर अनेक आरोप करण्यात आले होते. मनोज फार रंगेल होता. तो मुलींना काम देण्याचे वचन देऊन त्यांना फसवायचा. मुलींना फसवण्यासाठी तो अनेक युक्त्या लढवायचा. भोजपूरीमधील आपण फार मोठे स्टार आहोत असेच तो प्रत्येक मुलीला भासवायचा.
Mumbai: Charkop Police arrests Bhojpuri actor Manoj Pandey in an alleged rape case. A woman had filed complaint on September 15 against him.
— ANI (@ANI) September 22, 2017
भोजपुरी सिनेसृष्टीत मनोजच्या कुटुंबियांचा दबदबा आहे. मनोजचा भाऊ प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याचा भाचाही भोजपुरी सिनेमांमध्ये अभिनेता आहे. मनोजने ‘लहरिया लूट ए राजा जी’, ‘कईसन पियवा के चरितर बा’, ‘बलिया के दबंगई’, ‘सौगंध गंगा मईया के’, ‘लाल चुनरिया’ या सिनेमांत काम केले आहे. मनोज उत्तर प्रदेशमध्ये राहणारा असून पीडिताही उत्तर प्रदेशमध्येच राहते. पीडिता भोजपुरी गायिका असून तिच्या नावावर अनेक अल्बम आहेत.