सुप्रसिद्ध पॉप सिंगर आणि रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचा कायदेशिररित्या घटस्फोट झाला आहे. दिल्लीतील जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबीक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे. शालिनीने हनी सिंगविरोधात कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल करत घटस्फोट मागितला होता, त्यावर कोर्टात सुनावणी सुरू होती. कोर्टाने घटस्फोट मंजूर केल्यानंतर हनी सिंग आणि शालिनी यांचा ११ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Photos: २० वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री; एकाच मालिकेत काम करताना सहअभिनेत्याशी झालं होतं प्रेम

हनी सिंगची पत्नी शालिनीने गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता आणि पतीवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप केले होते. हनी सिंग आणि शालिनी यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघंही लग्न टिकवू शकले नाही आणि ११ वर्षांनी दोघंही वेगळे झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटाच्या बदल्यात सुमारे १० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, परंतु तिला पोटगी म्हणून १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. गायकाने न्यायालयात पोटगीचा एक कोटी रुपयांचा धनादेश सीलबंद कव्हरमध्ये शालिनीला दिल्याचं कळतंय.

समांथाच्या वडिलांनी शेअर केले तिचे आणि नागा चैतन्यचे लग्नातील फोटो; म्हणाले, “जी कथा अस्तित्वात…”

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शालिनी तलवारने पती हनी सिंगविरोधात मारहाण आणि हल्ला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तिने पतीसोबतच सासरच्या लोकांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने दावा केला होता की, एके दिवशी ती रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा तिचे सासरे सरबजीत सिंग दारूच्या नशेत खोलीत शिरले होते. सासऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला होता. याशिवाय शालिनीने पती हनी सिंगवर आरोप करत म्हटलं होतं की, लग्नानंतर हनी सिंग तिला मारहाण आणि शिवीगाळ करायचा. तसेच त्याचे लग्नानंतरही अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता.  

लव्ह, सेक्स और धोखा…! प्रेमविवाह, परस्त्रीयांशी शरीरसंबंध अन् घटस्फोट; अशी होती हनी सिंग आणि शालिनीची लव्हस्टोरी

दरम्यान, हनी सिंग आणि शालिनी यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती. इथून दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. या दोघांनी २३ जानेवारी २०११ रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार गुरुद्वारामध्ये लग्न केले होते, मात्र हनी सिंगने जवळपास ४ वर्षे आपल्या लग्नाबद्दलची माहिती लपवून ठेवली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapper and pop singer honey singh and shalini talwar divorce hrc
First published on: 09-09-2022 at 14:35 IST