‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने पहिल्यांदाच प्रीक्वल सादर केला. सहसा मालिकेचा दुसरा सिझन म्हणजे त्याचा सीक्वल असतो. पण ‘रात्रीस खेळ चाले २’ने ही प्रथा मोडून काढली असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेतील सरिता, शेवंता, काशी, वच्छी, अण्णा नाईक या भूमिका चांगल्याच लोकप्रिय आहेत. तर मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
संजीवनीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे, पण घरातून कधी अभिनयासाठी पाठिंबा मिळाला नसल्याचं ती सांगते. शाळेतील गॅदरिंगपासून तिने ही आवड जपली आणि नंतर रंगमंचावरही काम केलं.
संजीवनी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. तिचे हे फोटो पाहून वच्छीच्या भूमिकेतील हीच का ती संजीवनी असा प्रश्न तुम्हाला पडेल. वच्छीसोबतच वच्छीचा डान्सदेखील प्रसिद्ध आहे. कोणत्याही कोरिओग्राफरशिवाय केलेला हा डान्स चांगलाच व्हायरल झाला.
लहानपणी जरी घरातून पाठिंबा मिळाला नसला तरी आता पती आणि मुलाकडून अभिनयाचं कौतुक होतो असं ती सांगते. वच्छीच्या भूमिकेने मला खूप काही दिलं असं म्हणत तिने मालिकेचे आभार मानले.