एकल मातृत्वाची जबाबदारी चोखपणे पार पडत, त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतील करिअरची घडी व्यवस्थित सांभाळणे, अशा दोन्ही गोष्टींमध्ये तारेवरची कसरत करत एका बॉलिवूड अभिनेत्रीनं अनोखं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं. ती अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या रवीनाचा हा जीवनप्रवास पडद्यावर उलगडणार आहे.
१९९५ मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं. जवळपास तीस वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमधील ‘फिल्म कनेक्शन’ या शाळेने रवीनाच्या जीवनावर आधारित माहितीपटाची निर्मिती करण्याची परवानगी तिच्याकडे मागितली. एकल मातृत्वाची जबाबदारी पार पाडताना तिला आलेल्या अडचणी, करिअरवर झालेला परिणाम या सर्व गोष्टींवर या माहितीपटात प्रकाश पाडण्यात येणार आहे.
‘त्यावेळी स्त्री-वादाची फारशी चर्चा नव्हती. स्त्री-भ्रूण हत्यांचे प्रमाण अधिक होते. मुलींना दत्तक घेण्याची कल्पना तेवढी रुजली नव्हती. त्या दोन मुलींना जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मी त्यांच्या प्रेमातच पडली. पाहताच क्षणी प्रेम होणं ज्याला म्हणतात, ते बहुधा हेच असावं. तेव्हापासून माझ्या आयुष्यातील एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली. त्यांच्या बालपणीच्या आठवणी आजही माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतात. मायलेकींपेक्षा आम्ही आज एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहोत,’ असं ती म्हणाली.

वाचा : भांड्यांच्या दुकानात काम करणारा ‘तो’ झाला चित्रपट निर्माता
मुलींना दत्तक घेतल्याच्या निर्णयावरून अनेकांनी टीका केल्याचंही तिने सांगितलं. या निर्णयामुळे माझं करिअर संपुष्टात येईल, असं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र, त्याउलट सर्व चांगल्याच गोष्टी घडल्या. त्यांच्याशिवाय माझं आयुष्य इतकं सुंदर नसतं जितकं आज आहे, असंही ती पुढे म्हणाली.

वाचा : ‘सीबीएसई’ फेरपरीक्षेबाबत सेलिब्रिटींकडून नाराजी व्यक्त
रवीनाने दत्तक घेतलेल्या मुलींची नावं पूजा आणि छाया अशी आहेत. या दोघीही विवाहित आहेत. २००४ मध्ये रवीनाने अनिल थंडानीशी लग्न केलं. त्यानंतर तिला राशा आणि रणबीर अशी दोन मुलं आहेत.