करोनाने संपूर्ण देशात धुमाकुळ घातला आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळे करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता ‘जमाई राजा’ मालिकेत काम करणारा अभिनेता रवी दुबेला करोना झाल्याचे समोर आले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवीने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असल्याचे पोस्ट द्वारे सांगितले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. रवीची पत्नी आणि पंजाबी अभिनेत्री सरगुन मेहताने देखील कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. रवीने पोस्टमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याची विनंती केली आहे.

आणखी वाचा : अभिनेते मोहन जोशी करोना पॉझिटिव्ह

आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर करोना पॉझिटिव्ह

रवीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ‘माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया काळजी घ्या आणि प्रकृतीकडे लक्ष द्या. करोना लक्षणे जाणवल्यास तातडीने चाचणी करुन घ्या. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. माझ्या जवळचे माझी काळजी घेत आहेत. सुरक्षित राहा’ असे त्याने म्हटले आहे.

करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून १५ मे पर्यंत निर्बंध कायम आहेत. ठाकरे सरकारकडून आधी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याची शक्यता असून बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi dubey tested positive for covid 19 avb
First published on: 11-05-2021 at 10:42 IST