“भाऊ कोणाला दुखवत नाही हे अजिबात खरं नाही”; रवी जाधवने सांगितला भन्नाट किस्सा

‘टाइमपास २’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला हा किस्सा घडला होता.

bhau and ravi jadhav
भाऊ कदम, रवी जाधव

महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम याने नुकताच ५०वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीला बरेच मराठी कलाकार उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक रवी जाधवने भाऊ कदमचा एक भन्नाट किस्सा उपस्थितांना सांगितला. ‘टाइमपास २’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला हा किस्सा घडला होता.

भाऊने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रवी जाधव म्हणतोय, “भाऊ कधी कोणाला दुखवत नाही असं कोणीतरी म्हटलं आता. पण हे अजिबात खरं नाही. टाइमपास २च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा मला नीट आठवतोय. वरळी कोळीवाडा इथे शूटिंगचा पहिला दिवस होता. तिथलं एक घर भाड्याने घेतलं होतं आणि पहिलाच सीन भाऊचा होता, बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा. रात्रीपासून टीम भाऊला फोन करत होती आणि त्याचा फोन ‘अनरिचेबल’ होता. आम्हा सगळ्यांना फार काळजी वाटत होती की तो सकाळी येणार की नाही. सकाळी सीनसाठी सगळी तयारी झाली होती आणि तेव्हासुद्धा भाऊशी संपर्क होऊ शकत नव्हता. अखेर आठ-साडेआठच्या दरम्यान भाऊचा फोन लागला. फोनवर बोलणं झालं तेव्हा त्याने मला विचारलं की, अरे आज शूटिंग होतं का? मी त्याला म्हटलं की आज नाही आता आहे. कुठे आहेस तू? त्यावर भाऊ म्हणाला, मी काल एका गावात गेलो होतो आणि तिथे फोनला नेटवर्क नव्हता. आता मी कल्याणला पोहोचलो आहे. डोंबिवलीत घरी जाऊन फ्रेश होऊन लगेच शूटिंगला येतो. दुपारी अडीच-तीनच्या सुमारास भाऊ सेटवर आला आणि अशाप्रकारे बाथटबमध्ये अंघोळीचा सीन संध्याकाळी शूट झाला.”

 

View this post on Instagram

 

Fun Moments of BhauKadam Birthday Party… #bhaukadam #timepass2

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

पाहा फोटो : मालिकेत सावळी दाखवली जाणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे इतकी सुंदर

रवी जाधव यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. रवी जाधव हे सांगत असताना भाऊ त्यांच्या शेजारीच उभा होता आणि तोसुद्धा मजेशीरपणे हे सगळं ऐकत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ravi jadhav shared memories of timepass 2 shooting with bhau kadam watch video ssv