ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण होताच त्यांचा बंगला सील करण्यात आला आहे. मुंबईतल्या वांद्रेमधली बँडस्टँड परिसरात त्यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. मुंबई महापालिकेने बंगल्याचा परिसर सॅनिटाइज करून प्रतिबंधित क्षेत्र असल्याचं फलक तिथे लावलंय. त्याचसोबत सुरक्षारक्षकाच्या संपर्कात आलेल्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. परंतु रेखा यांनी करोना चाचणी करण्यास नकार दिल्याचं समजतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, करोना चाचणीसाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना रेखा यांच्या बंगल्याच्या गेटवरून परत फिरावं लागलं. रेखा, त्यांचा मॅनेजर फरझाना आणि इतर तीन कर्मचाऱ्यांच्या करोना चाचणीसाठी पालिकेचे कर्मचारी बंगल्यावर पोहोचले होते. मात्र बंगल्याचा दरवाजाच कोणी उघडला नाही. थोड्या वेळानंतर फरझाना यांनी दार न उघडताच आतून आवाज दिला आणि बंगल्याच्या फोनवर कॉल करून बोलण्यास सांगितलं. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसंच परतावं लागलं. काही वेळानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फरझाना यांना फोन केला असता रेखा यांची तब्येत बरी असून त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत असं सांगण्यात आलं. त्यामुळे रेखा यांना करोना चाचणी करून घ्यायची नाही, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rekha refuses to get tested for covid 19 despite multiple requests by bmc ssv
First published on: 14-07-2020 at 18:11 IST