सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’मध्ये दिसणार रिया चक्रवर्ती?

२ ऑक्टोबर रोजी बिग बॉस १५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिया चक्रवर्ती, सलमान खान, सुशांत सिंह राजपूत, Shamita Shetty, Bigg Boss 15, Tejashwi Prakash, Rhea chakraborty may be participate in salman khan show big boss 15रिया चक्रवर्ती, सलमान खान, सुशांत सिंह राजपूत, Shamita Shetty, Bigg Boss 15, Tejashwi Prakash, Rhea chakraborty may be participate in salman khan show big boss 15

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. आता रिया बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, दलजीत कौर आणि रिया चक्रवर्ती हे एकाच स्टूडिओच्या बाहेर दिसल्यामुळे सुरु झाल्या होत्या.

रियाने बिग बॉस १५मध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार आहे की पहिल्याच दिवशी स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी परफॉर्म करणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रिया ही तेजस्वी प्रकाश आणि दलजीत कौर बाहेर पडलेल्या स्टूडिओ बाहेर दिसल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत.

बिग बॉस १५ हा शो २ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, डोनल बिष्ट, करण कुंद्रा, निधी भानुशाली हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rhea chakraborty may be participate in salman khan show big boss 15 avb