रिहानाने अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात परफॉर्मन्स दिला. तिचा सादरीकरण इतकं जबरदस्त होतं की अंबानी कुटुंबीय व उपस्थितही तिच्या गाण्यांवर थिरकले. रिहानाचा हा पहिलाच भारतीय दौरा होता, यावेळी तिने प्री वेडिंग सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल अंबानी कुटुंबाचे आभार मानले व अनंत-राधिकाला शुभेच्छा दिल्या. मात्र तिने राधिकाचं नाव चुकवलं.

रिहानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मंचावरून तिच्या भारत दौऱ्याबद्दल भावना व्यक्त करते. तसेच अनंत व राधिकाला त्यांच्या प्री-वेडिंगसाठी शुभेच्छा देते. “इथं येणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला इथे बोलावलं त्यासाठी मी अंबानी कुटुंबाचे आभार मानू इच्छिते. अनंत आणि राधिका, मला इथं आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.” इथं रिहानाने चुकून राधिकाला रादिकी म्हटलं. ती पुढे म्हणाली, “तुम्हा दोघांचं नातं सदैव घट्ट राहो, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. तुमचं खूप खूप अभिनंदन.”

भर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनंत अंबानींच्या प्री -वेडिंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच रिहाना भारतात आली. मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, ईशा, श्लोका, आकाश आणि अनंत-राधिका यांनीही रिहानाबरोबर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. या संपूर्ण कुटुंबाने रिहानाबरोबर स्टेजवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.