‘जाती के बारे में क्यो न बोलू सर’, रिंकू राजगुरुच्या ‘२०० हल्ला हो’चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर दिसणार आहे.

200 halla ho, 200 halla ho trailer, 200 halla ho story, rinku rajguru, amol palekar, barun sobti, Sahil Khattar,
हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. तिचे असंख्य चाहते आहेत. रिंकूच्या आगामी प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. रिंकू लवकरच ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘२०० हल्ला हो’ या चित्रपटाच्या १ मिनिट ५३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात आले आहे. रिंकू राजगुरुने २०० महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास एकत्र आणले आहे. एकंदरीत ट्रेलर पाहाता रिंकूचा अभिनय पाहण्यासारखा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. सध्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : माझ्या बायकोचं नाव ‘जेनेलिया’ नाही; रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी झी ५ या अॅपवर प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rinku rajguru 200 halla ho movie trailer is out avb

ताज्या बातम्या