सोशल मिडियावर अभिनेता ऋषी कपूर ब-यापैकी सक्रिय आहेत. ट्विटरवर ते मजामस्ती आणि कमेंट्स करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण यावेळी ऋषी कपूर यांनी जे काही केलेय त्यामुळे वीरूचा पारा चढू शकतो आणि बसंती रागाने लाल होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्या पोस्टमुळे अनेकदा वाद होतात. काही वेळा त्यांच्या पोस्टमध्ये हलके फुलके विनोद असतात. तर कधी कधी ते आपल्या पोस्टमधून एखाद्याला निशाणा करतात. ऋषी यांनी यावेळी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत बरेचसे कुत्रे एकत्र दिसत असून त्यावर,’आम्हाला जाणून घ्यायचयं, बसंती आमच्यासमोर का नाही नाचणार?’ (  ”हम सब जानना चाहते हैं कि बसंती हमारे सामने क्यों नहीं नाचेगी” ) असे लिहण्यात आले आहे. इतकेच नाही तर याचसोबत ‘जवाब दो वीरू’ असे त्यांनी लिहले आहे.

खरंतर, ऋषी यांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवलेल्या ‘शोले’ या चित्रपटाची थट्टा केली आहे. ‘वीरूला गब्बरच्या अड्ड्यावर रशीने बांधण्यात आलेले असते. वीरूच्या जिवाच्या मोबदल्यात गब्बर बसंतीला नृत्य करण्यास सांगतो. त्यावेळी, वीरू ओरडून म्हणतो की, ‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना..’ यावरूनच ऋषी कपूर यांनी मस्करी करणारे हे ट्विट केले आहे. काही नेटिझन्सनी त्यांच्या या ट्विटला विनोदी ढंगाने घेतले तर काहींनी त्यावर टीका केली. असे असतानाही नकारात्मक प्रतिक्रियांना नजरअंदाज करत ऋषी असे ट्विट करतच असतात.

याआधी, त्यांनी अमेरिकेतील टीव्ही अभिनेत्री कीम कर्दाशिअनची तुलना कांद्याच्या पोत्याशी केली होती. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून एक फोटो पोस्ट केला होता. फोटोत एका बाजूला किम कर्दाशिअन तर दुस-या बाजूला कांद्याची पोत होती आणि त्याखाली ‘प्रेरणा कुठूनही मिळू शकते’ असे लिहलेले होते. या फोटोवर ‘जाळीदार पिशवीत कांदे’ असे लिहून त्यांनी हे ट्विट पोस्ट केले होते. खरंतर ऋषी यांनी किमच्या ड्रेसिंग स्टाइलला निशाणा केले होते. ऋषी कपूरनी किमची तुलना कांद्याच्या पोतीशी करताच नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor shares a meme which takes a dig at climax scene film sholay
First published on: 24-10-2016 at 16:42 IST