अभिनेता रितेश देशमुखच्या घरी आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रितेशची पत्नी जेनेलिया हिने दुसऱया बाळाला जन्म दिला आहे. रितेशने ही गोड बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली. रितेशने आपल्या चिमुकला रिआनचा फोटो ट्विट करून त्याच्या लहान भावाचे घरात आगमन झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय, माझी सगळी खेळणी आता त्याची होणार, असे म्हणत रिआन आपल्या लहान भावाचे स्वागत करत असल्याचेही रितेशने ट्विटमध्ये नमूद केले आहे.
WATCH VIDEO: कपड्यांची चोरी करताना रितेश सीसीटीव्हीमध्ये कैद!
जेनेलियाने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पहिला मुलगा रिआनला जन्म दिला होता. त्यानंतर रिआन वर्षभराचा असताना रितेश-जेनेलिया पुन्हा एकदा गोड बातमी देणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
Hey guys, my Aai & Baba just gifted me a little brother. Now all my toys are his…- Love Riaan pic.twitter.com/H8JSKE0A3d
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 1, 2016