अभिनेता रितेश देशमुख याची पावले पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली असून त्याचा ‘माऊली’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रितेशच्या चाहत्यांना या आगामी चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. त्यानंतर आता यातील दुसरं ‘धुवून टाक’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

४ वर्षानंतर रितेश आणि जेनेलियाने या चित्रपटात स्क्रिन शेअर केली असून रितेशने खास कॅप्शन देत हे गाणे ट्विटरवर शेअर केले आहे. ‘लय भारी’ चित्रपटातही होळीच्या रंगोत्सवरात रितेशचे ‘लय भारी’ गाणे सादर करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘माऊली’ चित्रपटातही होळींच्या रंगात रितेश आणि जेनेलियाचा धमाल डान्स पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १४ डिसेंबर रोजी रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे.