अभिनेता रितेश देखमुख सध्या चांगलाच गाजत आहे. बॉलिवूड, मराठी सिनेमे, वेगवेगळे कार्यक्रम आणि आता टीव्हीवरही जोरदार आगमनामुळे सध्या रितेश भलताच खुष आहे. ‘फास्टर फेणे’ या आगामी मराठी सिनेमाची निर्मितीही तो करत आहे. त्याच्या या निर्मितीत बायको जेनेलियाही तर मदत करतेच. नुकताच रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या ‘फास्टर फेणे’ या सिनेमाच्या मुहूर्ताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
रितेशने जेनेलियासोबतचाही एक फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. बॉलिवूडचं हे गोड कपल नेहमीच उत्साही आणि आनंदी दिसत असतं. हा फोटो शेअर करताना त्याने यावर छानसा मेसेजही लिहिला आहे. ‘या फोटोमध्ये जेनेलिया एखादी तरुणीच दिसत आहे आणि मी तिचा बाबा.’ रितेश सध्या त्याच्या वाढलेल्या दाढीमुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या या लूकमुळे तो खूप मोठा माणूस वाटतो असं त्याला वाटतं. तर दोन मुलांची आई होऊनही जेनेलिया मात्र अजूनही त्याला ‘टिनेजर’च वाटते.
रितेशला काहीही वाट असले तरी या दोघांच्या जोडीला बघून प्रेक्षक नेहमीच लयभारी असच म्हणत असतील यात काही शंका नाही. जेनेलिया आणि रितेशला रिआन आणि राहिल अशी दोन मुले आहेत. सध्या रितेश स्टार प्रवाहवरच्या ‘विकता का उत्तर?’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. याशिवाय झी टीव्हीच्या ‘यादों की बारात’ या कार्यक्रमाचेही तो सूत्रसंचालन करत आहे.