संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारंच, नवरा बायकोत कधी ना कधी खटके उडणारच. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात. बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. पण बायकोशी झालेलं गोड भांडण रितेशने नुकतंच ट्विटरवर आणल्याचं दिसतंय. रितेशने ट्विटरवर पोस्ट केलेला एक मीम पाहून या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय असा प्रश्न चाहत्यांनाही पडलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवर शेअर केलेल्या या मीममध्ये लिहिलंय, ”प्रत्येक चिडलेल्या महिलेमागे एक पुरुष असतो, ज्याला त्याच्याकडून नेमकी काय चूक झाली याचीच कल्पना नसते.” विशेष म्हणजे हा मीम शेअर करताना रितेशने जेनेलियाला टॅग केलं आहे. रितेशच्या या ट्विटवर आता जेनेलिया काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा : ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’, म्हणत प्रियांकाने करीनाला दिलं होतं सडेतोड उत्तर

रितेशच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही ‘कहानी घर घर की’ म्हणत त्याच्या सुरात सूर मिसळला. तर एकाने ‘वहिनीसाहेबांना टॅग करण्याचे धाडस…. मानले रितेश भाऊ तुम्हाला,’ अशी कमेंट केली. काहींनी तर जेनेलियाची प्रतिक्रिया काय असेल यावरून भन्नाट मीम्स तयार करून पोस्ट केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh shared a funny quote and tagged wife genelia ssv
First published on: 23-09-2019 at 12:16 IST