डेब्यू चित्रपटातूनच अनेकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रिया सेन. ‘स्टायल’, ‘शादी नं. १’, ‘सिलसिले’ आणि यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री सध्या बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली तरी बंगाली चित्रपटांमध्ये ती बरीच व्यस्त आहे. शीना बोरा हत्या प्रकरणावर आधारित ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच तिचा बॉयफ्रेंडसोबतचा एमएमएस लिक झाल्याने चर्चेचा विषय ठरली होती.
रिया ही देव वर्मा आणि मून मून सेन यांची मुलगी आहे. रिया ही तिच्या बोल्डनेससाठी देखील बरीच प्रसिद्ध आहे. पण एकदा रिया सेनसोबत असे काही घडले होते की ती चर्चेचा विषय ठरली होती. एका हॉटेलमध्ये ती वेटरला ‘कॅन आय हॅव सम सेक्स प्लीज’ असे चुकून म्हणाली होती.
Video: उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’चा देशी अवतार ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर
अंधेरी येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रिया गेली होती. या हॉटेलमध्ये ‘सेक्स ऑन द बीच’ हे कॉकटेल आणि ‘एग्ज ऑन द बीच’ नावाचा पदार्थ मिळतो. ‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, वेटर रियाच्या टेबलवर ऑर्डर घेण्यासाठी गेला असता, तिने पटकन ‘कुड आय हॅव सम सेक्स प्लीज’ असे म्हटले. पण, क्षणार्धातच रियाला तिची चूक उमगली. लगेचच तिने ऑर्डर बदलत म्हटले की, ‘कुड आय हॅव सम एग्ज प्लीज’. या गोंधळानंतर वेटर शांत होता. पण, रियाला तिची चूक लक्षात आल्याने ती जोरात हसू लागली होती.