बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. करोना काळात चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. दरम्यान, रोहित शेट्टी यूट्यूबर मित्राला भेटण्यासाठी उल्हासनगरला पोहोचला आहे.

रोहित शेट्टी निळ्या रंगाची गाडी घेऊन लोकप्रिय यूट्यूबर आशीष चंचलानीला भेटण्यासाठी उल्हासनगरला पोहोचला आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ आशीषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘खोलीमध्ये बसून व्हिडीओ तयार करणे ते उल्हासनगरमध्ये रोहित शेट्टी सरांना आणणे हा प्रवास माझ्यासाठी फार अव्हानात्मक होता. आज माझ्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘जवानी फिर ना आए’मधील सलमानच्या टॉवेलला मिळालेली किंमत पाहून फुटेल घाम

पुढे तो म्हणाला, ‘धन्यवाद रोहित शेट्टी तुम्ही तुमचे वचन पूर्ण केले आहे. तुम्ही जे शानदार काम केले आहे त्यासाठी तुम्ही कोणत्याही चित्रपटगृहामध्ये जाऊ शकत होतात. पण तुम्ही आमचे चित्रपटगृह निवडले. तुम्ही नेहमी दिलेला शब्द पाळता आणि त्यामुळेच चाहत्यांचे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे.’

आशीष चंचलानी हा अतिशय लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे जवळपास २६.८ मिलियन सब्सक्रायबर आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर त्याचे १२ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेक कलाकार त्याला फॉलो करताना दिसतात.