‘लाइफ पार्टनर’, ‘गली गली चौर है’, ‘गॉड तुसी ग्रेट हो’ अशा चित्रपटांचा दिग्दर्शक आणि ‘कुली नंबर वन’, ‘जोडी नंबर वन’ यांसारख्या ९० च्या दशकातील असंख्य चित्रपटांचा कथा- पटकथा-संवाद लेखक रूमी जाफरी याच्याकडे आता ‘शौकीन’ या चित्रपटाच्या रिमेकची धुरा सोपविण्यात येणार आहे. बासू चटर्जी दिग्दर्शित १९८२ साली झळकलेल्या ‘शौकीन’मध्ये अशोक कुमार, ए. के. हंगल, उत्पल दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
सुरुवातीला अभिनेता रोहित रॉय या चित्रपटाच्या रिमेकद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार होता. परंतु चित्रपटाच्या हक्कांवरून वाद निर्माण झाला. आता चित्रपटाचे हक्क सिनेकॉर्न बॅनरकडे असून मूळ चित्रपटाच्या पटकथेवर काम करून नंतर चित्रपटाचे दिग्दर्शनही रूमी जाफरीकडे सोपविण्यात आले आहे. या रिमेकमध्ये अनुपम खेर, परेश रावल, अनू कपूर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. मूळ चित्रपटाचे कथानक मुंबईत घडणारे होते. परंतु रिमेकमध्ये कथानक थायलण्डमध्ये घडणार आहे. अर्थात अशोक कुमार, उत्पल दत्त, ए के हंगल यांच्या व्यक्तिरेखा खेर-रावल-कपूर यांच्यापैकी कोणाकोणाला देण्यात येतील हे अद्याप निश्चित केलेले नाही.
तीन वृद्ध एका तरुण मुलीवर प्रेम करतात आणि काय धमाल उडते यावर हा चित्रपट असून मूळ चित्रपटात रती अग्निहोत्री हिने भूमिका साकारली होती. आता रिमेकमध्ये आजच्या काळातील वृद्ध दाखविण्यात येणार असून रती अग्निहोत्रीने साकारलेल्या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2013 रोजी प्रकाशित
रूमी जाफरी करणार ‘शौकीन’ च्या रिमेकचे दिग्दर्शन
‘लाइफ पार्टनर’, ‘गली गली चौर है’, ‘गॉड तुसी ग्रेट हो’ अशा चित्रपटांचा दिग्दर्शक आणि ‘कुली नंबर वन’, ‘जोडी नंबर वन’ यांसारख्या ९० च्या दशकातील असंख्य चित्रपटांचा कथा- पटकथा-संवाद लेखक रूमी जाफरी याच्याकडे आता ‘शौकीन’ या चित्रपटाच्या रिमेकची धुरा सोपविण्यात येणार आहे. बासू चटर्जी दिग्दर्शित १९८२ साली झळकलेल्या ‘शौकीन’मध्ये अशोक कुमार, ए. के. हंगल, उत्पल दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
First published on: 26-05-2013 at 04:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumi jaffery will direct shaukeen remake