टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाची त्याचे जगभरातील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एस एस राजामौलीच्या ‘बाहुबली’ सीरिजमधील दमदार अभिनयामुळे या हरहुन्नरी अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. ‘बाहुबली’साठी तब्बल चार वर्षे प्रभासने दुसरा कोणताच चित्रपट स्वीकारला नव्हता. पण, या भव्य चित्रपटाचे काम पूर्ण होताच त्याने पुढच्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : Happy Birthday Prabhas अबब! इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘बाहुबली’ प्रभास

अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’ तेलगू आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात प्रभासव्यतिरिक्त श्रद्धा कपूर, अरुण विजय आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत. ‘रन राजा रन’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय.

वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम राधिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्याकडे मागितले ‘हे’ गिफ्ट!

‘बाहुबली’नंतर प्रभासचे चाहते त्याचा ‘साहो’मधील लूक पाहण्याच्या प्रतिक्षेत होते. प्रभासचा ‘बाहुबली’पेक्षा एकदम हटके लूक प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना या अभिनेत्याचा वाढदिवस योग्य वाटला. आज प्रभास त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करतोय. त्यानिमित्त चेहऱ्यावर मफलर गुंडाळलेल्या प्रभासचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘साहो’च्या निर्मात्यांनी याच वर्षी हिंदी आणि तेलगूमध्ये चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saaho first look prabhas gifts fans his dark intriguing avatar on his birthday
First published on: 23-10-2017 at 10:27 IST