काही दिवसांपूर्वी वरुण धवनसोबत ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमात दिसलेल्या आलिया भट्टने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ‘बुमरँग व्हिडिओ’ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकरला त्याच्या आगामी सिनेमासाठी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ वर्षीय आलिया, सचिनची फार मोठी चाहती आहे. या बुमरँगमध्ये Sachin A Billion Dreams या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी स्वतःभोवतीच गोल फिरताना फक्त चार दिवस बाकी राहिले असल्याचे तिने दाखवलेय. आलिया आपल्या परीने या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसते. ‘खरंच माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. अनेक वर्षांपासून मला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही या जगातील सर्वात खास व्यक्ती आहात. तुमच्या सिनेमाची अजून प्रतीक्षा करू शकत नाही. तुमच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा.

त्यानंतर वरुण धवननेही सचिनला शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की, तो क्रिकेटचा देव आहे आणि माझा हिरोही आहे. मला आजही शारजा क्रिकेट स्टेडिअममधील ती मॅच आठवते जिथे सचिनने ऑस्ट्रेलियाविरोधात १४३ धावांची खेळी केली होती. मी सचिनची खेळी बघण्यासाठी सकाळी लवकर उठून सामना बघायचो. नंतर जेव्हाही सचिन खेळायचा माझ्यासाठी क्षण तिथेच थांबायचा. आलिया आणि वरुणच्याआधी सोनम कपूर आणि आमिर खाननेही सचिनला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. येत्या २६ मे रोजी ‘सचिन अ बिलियन ड्रिम्स’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin a billion dreams alia bhatt varun dhawan thank sachin tendulkar watch video
First published on: 23-05-2017 at 19:29 IST