बापलेकीची जुगलबंदी; सचिन व श्रिया पिळगावकरच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

श्रियाच्या सुरेल गाण्याचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

sachin pilgaonkar with dauther
सचिन पिळगावकर, श्रिया पिळगावकर

एरव्ही दिवसरात्र कामात व्यग्र असणाऱ्यांना आता लॉकडाउनमध्ये कुटुंबीयांसोबत मनसोक्त वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. अशी वेळ पुन्हा कधी मिळेल माहीत नाही, त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आवडत्या गोष्टी करण्याचा आनंद प्रत्येकजण लुटत आहे. अभिनेते सचिन पिळगावकर हेसुद्धा सध्या तेच करतायत. मुलगी श्रिया पिळगावकरसोबत मिळून त्यांनी एक गाणं म्हटलंय आणि या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत सचिन व श्रिया पिळगावकर ‘हाल कैसा है जनाब का’ हे गाणं म्हणताना दिसत आहेत. श्रिया चार वर्षांची असल्यापासून दोघं हे गाणं म्हणत असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं. हे गाणं आमच्या दोघांसाठी नेहमीच खास असेल, असंही त्यांनी म्हटलंय. या व्हिडीओतील श्रियाचा सुरेल आवाज ऐकून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : वयाच्या पन्नाशीनंतरही सुप्रिया पिळगावकरांच्या डान्सची कमाल; नेटकरी पडले प्रेमात

काही दिवसांपूर्वी सुप्रिया पिळगावकर यांनी डान्स करतानाच व्हिडीओ पोस्ट केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला होता. सुप्रिया पिळगावकर यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. आता सचिन व श्रिया यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sachin pilgaonkar and shriya pilgaonkar singing a song together during lockdown ssv