‘नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्समधील गुरुजी म्हणजे संघाचे गोळवलकर गुरुजी वाटतात’

“गुरुजींच्या माध्यमातून भारत सरकारवर संघ आणि संघाच्या गुरुजींचा प्रभाव असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न”

पंकज त्रिपाठीने साकारलेली गुरुजींची भूमिका

शिवसेनेच्या आयटी सेलमधील कार्यकर्ते असणाऱ्या रमेश सोलंकी यांनी नेटफ्लिक्सविरोधात काळबादेवी येथील एलटी मार्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नेटफ्लिक्सवरुन हिंदू धर्माची बदनामी होत असल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे सोलंकी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. सेक्रेड गेम्स या सिरीजमध्ये पंकज त्रिपाठीने साकारलेल्या गुरुजी या भूमिकेच्या माध्यमातून निर्मात्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुजींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे अशा अर्थाची तक्रार करण्यात आली आहे.

“आपल्या देशातील एका समाजसेवकाला प्रेमाने गुरुजी नावाने संबोधले जाते. सेक्रेड गेम्स या सीरीजमधून याच व्यक्तीवर टीका करण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते. शासन व्यवस्थेवर गुरुजींचा प्रभाव असल्याचे दाखवणे म्हणजे भारत सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या गुरुजींचा प्रभाव असल्याचे दाखवत ते अणुयुद्धाला तयार असल्याचे दाखवण्यासारखे आहे. तसेच गुरुजींच्या माध्यमातून आरएसएस दहशत पसरवण्यासाठी मुस्लीमांचा वापर करेल असं दाखवण्याचा हा प्रयत्न वाटतो. यावरुन वाद होऊ नये म्हणून निर्मात्यांनी ही भूमिका रजनीश यांच्यावर आधारित असल्याचे म्हटले आहे. या वेब सीरीजची पटकथा भयावह नसली तरी त्यांचा उद्देश हा भयावह आहे,” असं सोलंकी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘डीएनए’ने दिले आहे. सोलंकी यांनी तक्रारीमध्ये केवळ गुरूजी म्हटलं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदर्भ दिला असल्यामुळे गुरूजी म्हणजे संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी अभिप्रेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

“सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सच्या सिरीजमधून हिंदू धर्माला बदनाम करण्यात आले आहे. जगभरातील सर्व गुन्ह्यांसाठी हिंदू जबाबदार असल्याचे या सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. वेदांमधील अहम ब्रम्हास्मी आणि सेक्रेड गेम्सचे संगीत हे एखादी युद्ध घोषणा असल्यासारखे दाखवले जात आहे. एकमेकांना भेटल्यावर लोक हे शब्द वापरुन शुभेच्छा देत मानवतेविरुद्ध कारवाई करण्यास प्रवृत्त करतात असे या सिरीजमध्ये दिसतं. लैंगिक दृष्यांच्या आधारे भारतीय संस्कृतीमधील गुरु शिष्याच्या परंपरेलाही बदमान करण्याच्या प्रयत्न या सीरीजमधून करण्यात आला आहे,” असा आरोप सोलंकी यांनी केला आहे.

सेक्रेड गेम्सबरोबरच सोलंकी यांनी नेटफ्लिक्सवरील हिमा कुरेशीची भूमिका असणाऱ्या ‘लैला’, राधिका आपटेची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘घौल’ आणि हसन मिन्हाज याच्या स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या माध्यमातून देशाची आणि हिंदू धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sacred games 2 guruji character seems to be like rss guruji shiv sena man files plaint against netflix scsg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या